Tiranga Times Maharashtra
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ८९ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही.
शिंदे गटाने मोठ्या प्रमाणावर जागा लढवल्यामुळे भाजपच्या विजयाच्या टक्केवारीवर परिणाम झाल्याची नाराजी भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे. यामुळे मुंबईत भाजपचे संभाव्य नुकसान झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
निवडणुकीनंतर महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटप, निवडणूक नियोजन आणि पुढील सत्ता स्थापनेवरून मतभेद वाढताना दिसत आहेत. काही वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात पक्ष नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
महापालिकेतील सत्ता स्थापन करताना कोणता पक्ष महापौरपदावर दावा करणार, यावरूनही तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
